महाराष्ट्र देशातील किल्ले
आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता. […]