वास्तु विशेषांक
दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, […]