नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – संघभावना

कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्‍या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे. […]

सामाजिक शिष्टाचार – प्रस्तावना

आपल्या वागण्या बोलण्यातून दुसर्‍याशी संबंध निर्माण होतात. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हातात असते. आपल्या सहकार्‍यांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याखेरीज कामे नीट पार पाडली जात नाहीत. चांगल्या बोलण्या वागण्यातून चांगल्या कार्यसंस्कृतीचा पायाच घातला जातो. संस्थेच्या हितासाठी कर्मचार्‍यांना चांगल्या बोलण्या-वागण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. […]

शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं . […]

काय आहे टू जी घोटाळा ?

२००१ नंतर देशभरात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत होती. मोबाईल ऑपरेटर कंपन्यांवर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचे (ध्वनीलहरी) निर्बंध घातलेले असतात. मात्र, ग्राहकांची वाढती संख्या पाहून सरकारने नवीन ध्वनीलहरी खुल्या करण्याचा निर्णय घेतला. या ध्वनीलहरींना ‘टू जी स्पेक्ट्रम’ म्हणून ओळखले जाते. […]

काय आहे चारा घोटाळा ?

चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. […]

अमॅकस क्युरी म्हणजे काय?

गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरींनी म्हटलं आहे. सध्या आपण बर्‍याच खटल्यांच्या संदर्भात अमॅकस क्युरी हा शब्द ऐकतो. कोण असतो हा अमॅकस क्युरी ? एखाद्या क्लिष्ट प्रकरणात न्यायालय स्वत: वरिष्ठ वकील किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची नियुक्ती करते. प्रत्येक न्यायाधीशाला सर्वच विषयाची इत्यंभूत माहिती असतेच असं नसतं. त्यामुळे कोर्ट अमॅकस […]

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

१९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली. १९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला. […]

व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. […]

१६ डिसेंबर १८५४ – महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना

१६ डिसेंबर १८५४ रोजी “अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली […]

1 76 77 78 79 80 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..