नवीन लेखन...

आयुष्य पणाला लावणारे संशोधन

१९०३ साली पदार्थविज्ञानशास्त्रात, तर १९११ साली रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी एरी हिने आपले सारे आयुष्यच संशोधनासाठी पणाला लावले होते. पोलंडमध्ये एका निर्धन परिवारात तिचा जन्म झाला होता. मेरीचे वडील पदार्थ विज्ञानशास्त्राचेच अध्यापक होते व त्यांनी आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उघडली होती. मेरीची आजारी आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे मेरी सर्व घरकाम सांभाळून वडिलांना […]

हृदय परिवर्तन

क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी […]

खरे सुख

संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात. संत तुलसीदासांनी ‘तुलसीरामायण’ लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची. त्यांची पत्नीही […]

धर्मपिता आणि मानसपुत्र

स्वातंत्र्य चळवळीसाठी महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याला ज्यांनी तनमनधनाने मदत केली त्यात जमनालाल बजाज यांचा फार मोठा वाटा आहे. जमनालाल बजाज यांच्या पायाशी सारे वैभव लोळण घेत पडलेले असतानाही ते त्याच्यापासून अलिप्तच राहिले. आयुष्यात कोणी तरी चांगला गुरु लाभावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. त्या वेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून नुकतेच भारतात परतले होते व त्यांनी […]

पाणिनीची प्रतिज्ञा

आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्राच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या तसेच आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याचजणांचा हातावरील या रेषेवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांची मजेदार कथा सांगितली. पाणिनी तरुण असताना एका आचार्याकडे शिक्षण घेत होता. पाणिनीसारखेच आचार्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या आश्रमात त्यांच्याकडून शिक्षण […]

मातृभक्त सैनिक

एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे. एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. […]

संतुलनाची गरज

निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे ‘नको तो उन्हाळा’असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते. निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी […]

मन चंगा तो…

‘मन चंगा तो बगल मे गंगा’ असे म्हणतात. तुमचे मन जर शुद्ध, पवित्र असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी शुद्ध व चांगल्याच वाटतील. एखादा चांगला पदार्थ जर स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या भांड्यात ठेवला तर कोणाला देताना निश्चितच आनंद होईल. एका मनुष्याने सत्संगतीसाठी एक चांगले गुरू केले होते. दररोज तो त्यांच्याकडे जायचा व म्हणायचा, मला चांगला उपदेश […]

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले…

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे… स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे… राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी… स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे… गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची… स्वतंत्रते भगवती अन्यथा […]

वाचनवेडे अरविंद घोष

प्रारंभी जहाल क्रांतिकारक बनलेले परंतु नंतर अनेकांचे आध्यात्मिक गुरु झालेले अरविंद घोष यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. डॉक्टर असलेले त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष हे इंग्लंडला जाऊन शिकून आले होते. त्यामुळे त्यांच्या राहणीवर तसेच विचारसरणीवर पाश्चात्यांचा फार प्रभाव होता. आपल्याही मुलांनी संपूर्णपणे इंग्लिश लोकांसारखे राहिले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. इंग्रजी आमदानीत वाढलेले डॉ. कृष्णधन घोष नास्तिक […]

1 79 80 81 82 83 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..