मराठीच शब्द वापरा…
आपण रोजच्या व्यवहारात हे मराठी शब्द नक्कीच वापरु शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे ? […]
आपण रोजच्या व्यवहारात हे मराठी शब्द नक्कीच वापरु शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे ? […]
शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेत कायस्थ प्रभु ज्ञातीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणार्या आणी प्रसंगी बलिदान करणार्या ज्या ज्ञाती होत्या त्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञाती ही अग्रस्थानी होती. शिवशाहीसाठी कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले असे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने यातील काही कायस्थ वीरांची थोडक्यात माहीती. 1. […]
सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप. पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.
कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत […]
दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… वसु बारसला ।।१।। दिन दिन दिवाळी… आरोग्य सांभाळी… धन त्रयोदशीला ।।२।। दिन दिन दिवाळी… दुःखाला पिटाळी… नरक चतुर्दशीला ।।३।। दिन दिन दिवाळी… लक्ष्मीला सांभाळी… अश्विन अमावस्येला ।।४।। दिन दिन दिवाळी… नववर्षाची नवाळी… बळी प्रतिपदेला ।।५।। दिन दिन दिवाळी… भावाला ओवाळी… यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा. खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे. असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे […]
अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे काल रात्री (२३ आक्टोबर) निधन झाले. अन्नपूर्णा, इच्छाभोजन, मांसाहारी, चायनीय पदार्थ तसेच खाद्य पदार्थांवरची विविध छोटी छोटी पुस्तके, डोहाळे बारसे, रुखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध होती. मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.
आज गावत मन मेरो झूम के या गाण्याबद्दल मी काय लिहू ? पं डी वी पलुस्कर आणि उस्ताद आमिर खाँ – दिग्गज गायक. हे गाणं म्हणजे बैजू आणि तानसेन ह्यांच्यातील जुगलबंदी!!! आणि ही जुगलबंदी बैजूने जिंकलेली दाखवायची. या चित्रपटात संगीत नौशादसाहेबांचं आणि गाणं मोहम्मद रफ़ी आणि उस्ताद आमिर खाँ यांच्याकडून गाऊन घ्यायचं निश्चित झालं. बैजूनं तानसेनवर […]
गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम…दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले… आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस…रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी…त्यांचा फारसा विरोध झाला नाही.. जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती […]
एक माणूस स्वच्छतेचा फारच भोक्ता होता. मात्र त्याचा अतिरेक एवढा वाढला की, या स्वच्छतेच्या नादापोटी त्याला सगळ्या गोष्टी अमंगळ वाटू लागल्या. घरामध्ये दैनंदिन कामे करताना जी अस्वच्छता व्हायची तिलाही तो कंटाळला व एके दिवशी स्वतःचेच घर सोडून तो दुसऱ्या गावी गेला. परंतु तेथेही त्याला जिकडेतिकडे घाण दिसू लागली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसला […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions