नवीन लेखन...

श्र्वास आणि इतर कथा

‘श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्र्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्र्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची. श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह. श्र्वास आणि इतर कथा लेखिका : माधवी घारपुरे प्रकाशक : अनघा प्रकाशन, […]

फिल्मी चक्कर – सिनेसृष्टीत मारलेला फेरफटका

मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारंच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न सफल झाला आहे. मोठे आर्टिस्ट असले तरी ते त्यांच्या सहवासातील छोट्या लोकांशी कसे मोठेपणा झुगारुन वागत याची खूप उदाहरणे पुस्तकात मिळतील.         फिल्मी चक्कर लेखक : रमेश उदारे प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व मूल्य : १३०/- […]

गर्भगिरीतील नाथपंथ

नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.   हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्‍या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ […]

हिमशिखरांच्या सहवासात

लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं […]

राजा थिबा

मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी ‘थिबा पॅलेस’ […]

मंदिरात दोष पाहु नयेत

एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले. पुजा संपल्यावर श्रीगुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना […]

मराठीत “लागण्याची” गंमत बघा

मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण […]

नवस आरोग्याचा… वसा वजन कमी करण्याचा

डॉ. कविता पवन लड्डा, लातूर, महाराष्ट्र. यांचे द्वारे महत्वपुर्ण माहीती खास तुमच्यासाठी. शुक्रवारी श्राध्द पक्ष संपून एक तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी करण्याचे यंदा व्रत घेऊ या , यंदा […]

1 83 84 85 86 87 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..