वाद्यांचे स्वभाव
बासरी – चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी. कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा, कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका, कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार. जलतरंग – मूर्तीमंत आशावाद. जीवनरसाने ओथंबलेला. सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा. हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा. ह्याच्या सहवासात आल्यावर […]