श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी….
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे. जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी […]