‘उत्कर्ष प्रकाशन’ चे सु. वा. जोशी
वर्ष १९५७… वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. होताहोता पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि ही वाटचाल तब्बल पन्नास वर्षे करीत तो आज आघाडीचा पुस्तक प्रकाशक व […]