फालतू टोल नाके बंद केले आणि आमदारांनी फटाके वाजवले…..
लेखकः अनंत कुलकर्णी, ठाणे आघाडी सरकारचे वाभाडे युतीने काढले आणि युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्तीचे आश्वासन युतीने दिले होतेच. त्याला अनुसरुनच युतीने निर्णय घेतला आणि फालतू टोल नाके बंद केले. जे टोलनाके जनतेला त्रासदायक वाटत होते ते तसेच राहिले. मुंबईत प्रवेश करताना अजूनही टोल भरायला लागतोच. ठाण्याहून दररोज मुंबईत जाणार्यांचे रोजचे ७० रुपये आणि अर्धा तास बरबाद होतोच. परट्रोल – डिझेल जळते ते वेगळेच. पण सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक बाब ही आहे की हे टुकार टोलनाके बंद झाले तरीही त्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या आमदारांनी फटाके वाजवले….. सेलेब्रेशन केलच…. सरकारी गाड्यांमधून फुकट फिरणार्यांना जनतेची दुःख काय कळणार? कॉंग्रेंस असो की राष्ट्रवादी, भाजप असो की शिवसेना.. सगळे एकाच माळेचे मणी….