कोरोना ‘चक्रव्यूह’
कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. […]