नवीन लेखन...
Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

कोण होणार मुख्यमंत्री?

या विधानसभा निवडणुकीने विरोधकांच्याच नव्हे तर सत्ताधार्‍यांच्या ही डोळ्यात अंजन घातले आहे. तुम्ही जनतेला गृहीत धरून त्यांच्या प्रश्नांची हेळसांड करणार असाल तर जनता तुम्हाला घरी बसू शकते, हा संदेश जनतेने मतपेटीतून दिलाय. त्यातील मतितार्थ राजकारण्यांनी समजून घेतला पाहिजे. […]

मोदी है तो मुमकिन है !

आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय.. […]

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !

महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ? […]

ऐतिहासिक निकाल!

वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे. […]

शेतकऱ्यांना मुक्त करा

शेती व्यवसाय ‘प्रगत’ आणि ‘समृद्ध’ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आजवर अनेकदा अधोरेखित करण्यात आली. शेतीच्या विकसितकरणासाठी नवनवीन संशोधनाच्या घोषणाही बऱ्याचदा करण्यात आल्या. मात्र अंलबजावणीच्या पातळीवरील सगळ्या चर्चा आणि घोषणा वांझोट्या ठरत असल्याचे चित्र समोर येत असून त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यात नवनव्या मुद्यावरून संघर्ष उफाळून येत आहे. […]

यश तुमचंच आहे..!

…. सर्वाना मनाप्रमाणे यश मिळावे ही सदिच्छा.. परंतु काही कारणाने अपयश आलेच सर्वप्रथम पालकांना विनंती कि, मुलांच्या अपयशाचे भांडवल करण्यापेक्षा, त्याची इतरांशी तुलना करून चारचौघात त्याला अपमानित करण्यापेक्षा त्याला समजावून घेण्याची गरज आहे. पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. […]

चिनी कोलदांडा

चीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले.. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचं शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत याचं पुन्हा प्रत्यंतर आलं. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘जैश-ए-महंमद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने पुन्हा एकदा कोलदांडा घालून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. […]

संघर्षातून समोपचारकडे !

राममंदिर प्रकरणी सुरु असलेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा समारोप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सामोपचाराचा मार्ग सुचविला आहे. परस्परांची सहमती असेल तर कोणताही मुद्दा सामोपचाराने मिटवला जाऊ शकतो. समंजसपणे तोडगा काढल्यास सामाजिक सलोखा कायम राखण्यासही मदतच होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचे स्वागत करावे लागेल. अर्थात, राम मंदिर आणि बाबरी मशीद हा काहींसाठी राजकारणाचा मुद्दा बनेलला आहे. त्याचा असा ‘निकाल’ लागणे त्यांना कितपत रुचेल हा एक प्रश्नच आहे. […]

रात्र वैऱ्याची आहे! सावध असा ! दक्ष असा !!

युद्ध फक्त सैनिक लढत नाहीत तर देशाच्या नागरिकांनाही संयमाचे आणि विवेकाचे युद्ध लढावे लागत असते. त्यामुळे विद्यमान नाजूक परिस्थितीत भारतीय नागरिकांनी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. समाजमाध्यमवर व्यक्त होतांना संयम आणि विवेकाचं भान प्रत्येकाने ठेवायला हवे. देशांतर्गत शांतता बाधित होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते. मात्र, पाठीत वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. तेव्हा, जन हो सावध असा ! दक्ष असा !!रात्र वैऱ्याची आहे !!! […]

सर्जिकल स्ट्राईक २

दहशतवादी हल्ला झाला कि केवळ निषेधाच रडगाणं गाणारा भारत असा काही पवित्रा घेईल असे पाकिस्तनाला स्वप्नातही वाटलं नसेल! त्यामुळेच त्याची आता धांदल उडाली आहे. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास पाकी लष्कर सज्ज असल्याच्या वलग्ना पाकचे लष्करप्रमुख करत असले तरी वायुदलाच्या नुसत्या ट्रेलरने पाकची भंबेरी उडाली आहे. […]

1 2 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..