नवीन लेखन...
Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

आता बस्स झाले..!

‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’! पाकच्या बाबतीतही सुरवातीपासून असाच अनुभव आलेला आहे. एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्थानने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत. त्यामुळे भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..! […]

साधता संवाद..संपतील वाद… !

तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. […]

प्रजेची सत्ता ?

देश असो कि समाज तो लोकांनी मिळून बनत असतो.. हेच लोक यंत्रणेतही असतात. त्यामुळे कोणतीही शासनव्यवस्था टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी ‘लोक’ समंजस आणि जागरूक असणे फार गरजेचे असते. जशी प्रजा असेल तसेच त्यांना राज्यकर्ते मिळत असतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे, देशाच्या एकंदर परिस्थिती बाबत दोष देण्यासाठी आपण एखाद्याकडे बोट दाखवणार असू, तर चार बोटे आपल्याकडेही आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. […]

कुछ तो लोग कहेंगे..!

“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो. […]

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..!

प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..! […]

हात दाखवून अवलक्षण?

यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध  निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. […]

मैं रहूँ भूखा तो तुझसे भी न खाया जाए्‌

वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी वेतन आयोग जरुरीचाच. पण, महागाई फक्त कर्मचा-यांनाच असते का? शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का? आज देशभरातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दहा वर्षानंतर एक वेतन आयोग या नियमाप्रमाणे स्वातंत्र्याच्या सात दशकात कर्मचाऱ्यांसाठी सात आयोग सरकारने नेमले आणि लागू देखील केले. मात्र कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी आजवर केवळ एक (स्वामिनाथन)आयोग नेमण्यात आला, आणि त्याच्याही नशिबी वनवासच आला आहे. […]

राजकारण्यांचे नाकाने कांदे सोलणे

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!! […]

शिक्षणाच्या बाजारीकरणावर शिक्कामोर्तब ?

शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव झाल्यानंतर काही मोजक्या शिक्षण संस्थांनी व्रतस्थाप्रमाणे विद्यादानाचे पावित्र्य सांभाळले. मात्र बहुतांश शिक्षण संस्था म्हणजे पदव्या मिळवून देणाऱ्या ‘फॅक्टऱ्या’ बनल्या. के.जी. ते पी.जी. चे रेट फिक्‍स करून एकादं प्रोडक्ट विकावं तसं त्यांनी शिक्षण विकायला सुरवात केली. याचे दुष्परिणाम म्हणजे, पाण्यासारखा पैसा ओतून पदव्या मिळवाव्या लागत असल्याने पदवी घेऊन फक्त पैसे कमविण्याचाच विचार बहुतांश विद्यार्थी करतात. त्यामुळे, शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार असलेले मंदिर असते. विद्या हे दान आहे, ती काही विकण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही, असा युक्तिवाद केला जात असला तरी, शिक्षणाचा बाजार भरवला गेलाय, हे वास्तव आहे. […]

‘मराठा’ आरक्षणाच्या उंबरठ्यावर

वीस-पंचवीस वर्षांचा संघर्ष, ५८ मूक मोर्चे, ठोक आंदोलने आणि अनेक मराठा बांधव समाजासाठी शाहिद झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आरक्षण लागू करण्यासाठी मराठा समाजाच्या एकंदर परिस्थितीचे अध्ययन करणाऱ्या मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून यात मराठा समाजाचं आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण मान्य करण्यात आलं आहे. […]

1 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..