नवीन लेखन...

शेरूच्या केसची दीर्घकथा

दररोज सकाळी ऑफिसला आल्या आल्या आमचे वरिष्ठ सहकारी इन्स्पेक्टर चंद्रकांत भोसेकर हे संपूर्ण स्टाफला समोर उभं करून “All’s well” घेत असत. त्या दरम्यान आमच्या गोळे हवालदारांनी शेरू मुंबईत स्पॉट झाल्याबद्दलची खबर दिली. भोसेकर साहेब सावरून बसले. ” कधी समजलं तुला ? “” काल रात्री सर . माझा शेजारी माटुंग्याला डीटेक्शनला आहे . त्याने सांगितलं . […]

अतिपरीचयाने अवज्ञा झालेली मोहक वनस्पती – तेरडा

अतिपरीचयाने अवज्ञा झालेली एक मोहक वनस्पती. ऊनपावसाने सतत न्हाऊन सदैव ताजीतवानी असलेली . श्रावणात निसर्गाने धरती रंगवायला घेतली की माळरानांवरील पायवाटांच्या दोन्ही बाजूने तेरड्याच्या भल्या मोठ्या रांगोळ्या पसरायला सुरुवात होते. […]

कर्णfool…..

घरात टी व्ही पहात असताना डोक्यावर भणाणता पंखा असल्याने , पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते . मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर ” अजून ? ” अशी मोठ्ठ्याने सामुदायिक पृच्छा झाली . मी ” हो ” म्हणाल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहून भुवया उंचावल्या . काही दिवसांनी हेडफोनस् लाऊन यू ट्यूब वरची गाणी ऐकत होतो. दरवाज्याची बेल वाजली […]

निसर्ग कालचक्र

उंच झाडावरून तयार नारळ खाली जमिनीवर पडला तरी आतील ” बीज ” सुखरूप राहावे म्हणून चवडांचं भक्कम आवरण त्याचं संरक्षण करतं आणि पाण्यात पडला तरी पाण्याच्या तळाशी न जाता त्या नारळाला तरंगत असतानाही कोंब फुटतो. निसर्ग अगाध आहे. […]

आई ती आईच – भाग तीन

२००९ साली माझ्या फार्मवर पहिली गाय आणली गेली. नंदिनी तिचे नांव. खिलार जातीची , देखण्या लांब शिंगांची, शुभ्र पांढरी , उंच , निळ्या डोळ्यांची आणि फार डौलदार. फार्मची शान होती ती. […]

आई ती आईच – भाग दोन

१९९९ मधे माझे धुळ्याला पोस्टिंग असतानाचा असाच एक हृद्य अनुभव. उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री ८.३० वाजता सुद्धा डांबरी रस्ता तापलेला. मी धुळे शहरातून स्टाफसह night round दरम्यान नरडाणा मार्गे शिरपूरकडे निघालो होतो. […]

तेथे पाहिजे जातीचे

१७ व्या मजल्या वरील गच्चीच्या अठरा फूट उंचीच्या वीस वर्ष जुन्या ग्रीलच्या गंजलेल्या शिगा घासून साफ करणे , जास्त गंजलेले आडवे पाइप कापून काढणे , नवीन पाईप वेल्डिंग करून बसवणे आणि सगळ्याच ग्रील्स प्रथम प्रायमर मारून नंतर रंगवणे इत्यादी अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्यासाठी अनेक स्थानिक फॅब्रिकेटर्सना मी संपर्क केला होता . […]

सीताहरण 

१९७० च्या दशकाच्या अखेरची ही गोष्ट. ” ड्युटी ऑफिसर ” म्हणून मी मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात बसलेला असताना रात्री ११.०० च्या सुमारास सोळा अठरा वर्ष वयाचे दोन तरुण पोलिस ठाण्यात अचानक धापा टाकत समोर उभे ठाकले. त्यांचा अवतार पाहून चार्जरूममधील आम्ही सर्वजण ताडकन उभेच राहिलो. ” अरे ! क्या हो क्या गया है ? कहाँसे आये […]

पुनर्बालपण

मध्यंतरी आठ दहा दिवस माझ्याकडे रहायला आली होती. मी बाजारात निघालो तर म्हणाली , ” मी येते ” . म्हटलं, चल. कोथिंबिरीच्या एका चांगल्या जुडीसाठी तिन ठिकाणी मला फिरवत आणि तागडीतील प्रत्येक लहान वांगसुद्धा दाबून , गोल फिरवत पाहून तपासून घेणाऱ्या तिने बाजाराला दीडपट वेळ लावला . वर , घरी आल्यावर बायकोला ” अजितला अजूनही बाजारहाट काडीचा जमत नाही “, हेही सांगून टाकलं. मात्र ही आली की माझी खाण्याची चंगळ असते . […]

मी एक भाग्यवान

आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते . […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..