कवितांची जन्मकथा
कोणतीही कविता निर्माण व्हायला मराठीत (किंवा इतर कुठल्या भाषेत) कोणते शब्द अस्तित्वात आहेत हा दैवाचा भाग अटळपणे नेहमी प्रकर्षाने असतो. मुख्यत्वे संस्कृत आणि फारसी/अरबी/उर्दू शब्द जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपांमधे अवतरून सध्याच्या मराठी भाषेतले शब्दभांडार तयार झाले आहे. केवळ एक उदाहरण म्हणून मी ग. दि.माडगूळकरांचे खालचे सुंदर गीत उद्धृत करत आहे. […]