निवडणुक जाहीरनामा आणि मतदारांचा माहितीचा अधिकार
भारतीय निवडणुक आयोगाने राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करून निवडणुक जाहिरनाम्यांबद्दल काही दिशानिर्देश जाहीर केले होते परंतु आयोगाने ह्या गोष्टीची नोंद घेतली नाही की मतदाराला निवडणुक जाहीरनाम्यांतील त्या आश्वासनांचे पुढे काय झाले हे जाणण्याचा अधिकार असणे आवश्यक आहे. पुढील निवडणुक होण्याआधी राजकीय पक्षाने किंवा उमेद्वाराने त्याच्या मागच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांचे नक्की काय झाले हे उघड न केल्याने मतदार त्याच्या माहिती मिळवण्याच्या हक्कापासून वंचित राहतो व त्याची योग्य निर्णय घेण्याची क्षमता हिरावून घेतली जाते. […]