अतिरेकी सरकार
जखमा उरांत माझ्या, आहेत अजूनी ताज्या, शासनकर्त्या नाकर्त्या तू हो आता तरी जागा गेंडयाच्या तव कातडीची तू, कुठवर राखशी नीगा? त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू काढ शोधूनी धागा स्फोट मालिका सदाच घडती, मुंबापुरीच्या कुशीत, निद्रीस्त सुरक्षा तुझी, घुसती अतिरेकी वेशीत पूरे जाहले नाटक तुमचे, समिती-चौकशी–खटल्याचे, वरातीमागून धावत येते, घोडे तुमचे नित्याचे जनतेच्या मग पैशावरती, दान वाटिता लाखाचे […]