आम्ही सारे कायस्थ
परवा मी गांवदेवी मार्केटमधे भाजी घेण्यात व्यस्त होते. तोच कानावर शब्द पडले….. अग मोहिनी उद्या सोमवार! पण बिरड्याचे वाल टाकायचे राहिले नं काल, ते सोललेले वाल घ्यायला मला नाय बाई आवडत. आता करीन झालं ‘वडीचं सांबार’.…. ते टिपीकल “कायस्थी” शब्द ऐकून मी बाजूला आदराने बघितलं. मग ओळख निघाली … मग कुठूनतरी नातं देखील निघालं…हे अस्सं असतं आम्हां कायस्थांचं. […]