मैत्री
रक्ताच्या नात्याहूनही आगळी, ह्या नात्याची किमया, ना कोमेजे सुगंधीत ह्या मैत्र फुलाची काया | दु;ख-संकटी सदा पाठीशी,मैत्रीची छाया, मैत्रीसारखी जगी नाही, धन-संपदा-माया | मैत्रीत नाही वजाबाकी, अन् नाही भागाकार, नफा-तोटाही नसे त्यामधी, नच असे व्यवहार | जात-पात ना वय जाणिते, निरपेक्ष-निर्मळ मैत्री, शब्दाविणही मुक्त भावना, दिसून येते नेत्री | विश्वासाने विसावण्याचा, खांदा एक मैत्रीचा, निर्णयासाठी कधी […]