नवीन लेखन...

मला देव भेटला

मला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता. मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो. […]

आठवणींचे शिंपले वेचताना

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे. […]

रम्य ते बालपण : नितीन निगडे

खरेच छान दिवस होते बालपणीचे, पोषक वातावरणही त्या जोडीला मला लाभले. मौजमस्ती, गमती जमती याला मिळालेली भरभक्कम अशी चांगल्या संस्कारांची मजबूत पायरी. अशा सर्व जमेच्या बाजू असणाऱ्या बऱ्याच आठवणी या लिखाणाच्या निमित्ताने एकेक करून समोर दिसू लागल्या. […]

रम्य ते बालपण : यजुवेंद्र महाजन

माझा जन्म जळगावचा. मात्र माझे सारे बालपण आणि शालेय शिक्षण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी झाले. माझे वडील पेशाने डॉक्टर होते. तरी गावात नर्सरी, पोल्ट्री, फिशरी, गाई-म्हशींचा गोठा व्यावसायिक उपक्रम त्यांनी चालवून पाहिले. बालपणीचा काळ विविध अनुभवांनी समृद्ध ठरला. […]

रम्य ते बालपण : रविंद्र मांडे

माझे लहानपण तालुका, पण खेडेवजा ठिकाणी गेले. गावात नगरपालिकेच्या पहिले ते सातवी मराठी शाळा. तो काळ साधारण १९५५-५६ चा होता. पावसाळ्यात शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. […]

रम्य ते बालपण : धनराज खरटमल

साठच्या दशकात कुर्ल्यातल्या माळरानावर आम्ही राहायला आलो तेव्हा माझ्या बाबांनी जागा घेऊन तेथे एक चाळ बांधली होती. मुंबईत कधी काळी माळरानेही अस्तित्वात होती हे वाचून खरे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सभोवार उघडे माळरान आणि आसपास काही चाळी. […]

रम्य ते बालपण : चित्तरंजन भट

नागपुरात आमच्या घरीही बाबांना भेटायला खूप लोक येत असत. बहुतेक माणसे साधीसुधीच असायची. बरेचदा नावाजलेली माणसेही यायची. बाबांच्या खोलीत मग गप्पांची, हास्यविनोदाची सत्रं चालायची. चहाच्या खेपा व्हायच्या आणि आई थकून जायची. विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक मंत्रीमंत्री आणि आमदारही बाबांना खास भेटायला येत असत. उल्हास पवार, सुशीलकुमार शिंदे तर नेहमीचेच. […]

रम्य ते बालपण : मोहन वर्दे

आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल. […]

रम्य ते बालपण : मुरलीधर नाले

बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. […]

लहानपणाचा ठेवा

गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली. […]

1 11 12 13 14 15 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..