लहानपणाच्या सुखद संस्कारक्षम आठवणी
बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत. […]