सूर्यास्त
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला निवांतपणा मिळतो. मग जरा मागे वळून बघावसं वाटतं आणि तेव्हा हळूहळू सुरवातीचा काळ आठवतो. आयुष्याची परंपरागत विभागणी चार भागात आश्रमात केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तशीच ही सुद्धा एक व्यवस्था आहे. बालपण, किशोरवय, प्रौढपण आणि मग हळूहळू म्हातारपण. […]