तळापासून ढवळल्यानंतर
कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाचे असण्याचा धोका आहे. ग्लोबलायझेशननंतर व्हायरस, डिस्क, डिलीट डेटा असे शब्द आले की झाली पोस्टग्लोबलायझेशन कविता असे वाटून कितीतरी कविता प्रसवल्या गेल्या. आता मास्क, सोशल डिस्टंसींग, सॅनेटायझर लॉकडाऊन यांचा मुक्तपणे वापर म्हणजे कोरोनोत्तर कलाकृती असा समज करून दिला जाऊ शकतो. […]