भरारी
एक राजा हौसेने दोन गरुड आणतो. त्याला त्या गरुडांची आकाशातली भव्य भरारी पहायची असते. एका गरुडाला हातावर घेऊन तो आकाशाकडे उडवतो. क्षणार्धात तो गरुड आकाशात झेप घेतो. राजा अगदी हरखून जातो. दुसऱ्या गरुडालाही तसेच झेप घेण्यासाठी तो हातावर घेतो. मात्र हा गरुड न उड़ता झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. राजा हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. गरुड काही केल्या उडत नाही. […]