नोव्हेंबर १२ : डडली नोर्स आणि टूजची नऊ दिवसांची प्रतीक्षा
कसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्यावरील संघातच नव्हे तर खेळणार्या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
[…]