नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम

१४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्‍या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्‍या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता. […]

ऑक्टोबर १५ गोलंदाज गूच आणि वकार-वसिम शो

१५ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत नेहरू चषकाचा सामना श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यान झाला. अलेक स्टेवर्ट आणि अँगस फ्रेजर यांनी आपापली पदार्पणे साजरी केली. ग्रॅहम गूचने अनपेक्षितरीत्या या सामन्यात गोलंदाजीत यश मिळविले. […]

ऑक्टोबर १६ ‘पाका’गमन आणि अष्टपैलू कॅलिस

१६ ऑक्टोबर १९५२ : पाकिस्तान कसोटी खेळणारे सातवे राष्ट्र बनले. पूर्वीच्या संघांच्या इतिहासाप्रमाणेच त्यांचा सुरुवातीला चोळामोळा झाला. लाला अमरनाथ या सामन्यात भारताचे कर्णधार होते. त्यांचा जन्म ‘आताच्या’ पाकिस्तानात झालेला होता. […]

ऑक्टोबर १७ जम्बो लँड्स आणि कोलम्बोचा कलंदर

१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला. […]

ऑक्टोबर १८ झिम्मींची पहिली कसोटी आणि आरंभशूर नरेंद्र

१९६८ : दणदणीत पदार्पण, खणखणीत पुनरागमन आणि चटपटीत अपयश अशा विचित्र रंगांची कारकीर्द लाभलेल्या नरेंद्र दीपचंद हिरवानीचा जन्म. स्थळ गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्याच्याइतके झक्कास पदार्पण लाभायला भाग्यच हवे. […]

ऑक्टोबर ०६ – टोनी ग्रेग

नाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे. […]

ऑक्टोबर ०७ – जहीर खान आणि सगळे एकेकदा बाद

७ ऑक्टोबर १९७८ रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपुरात जहीर खानचा जन्म झाला. मुंबई हा क्रिकेटमध्ये सवतासुभा असल्याने तो वगळता महाराष्ट्रात जन्मलेला खेळाडू भारतीय संघात निवडला जाणे ही आता महामुश्किल बाब झाली आहे. […]

1 14 15 16 17 18 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..