यष्टीवेधी बर्टी आणि सच्चूचे पहिले शतक
कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते.
[…]