पाकिस्तान, पैसा आणि पचका – दौरा आता आवरा !
पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?) […]