नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

जानेवारी १९ : अजिंक्य संघाचा सलामीवीर

१९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून.
[…]

जानेवारी १८ : आरंभशूर विनोद कांबळी

…झाले मात्र उलटेच. सचिनच्या रणजी पदार्पणानंतर तीन वर्षांनी विनोद कांबळीचे रणजीपदार्पण झाले. रणजी स्पर्धेत सामना केलेल्या पहिल्यावहिल्या चेंडूवर विनोद कांबळीने षटकार मारला होता !
[…]

जानेवारी १७ : सर क्लाईड वॉल्कॉट

१७ जानेवारी १९२६ रोजी सर क्लाईड वॉल्कॉट यांचा जन्म झाला. वेस्ट इंडीजकडून एकाच काळात खेळलेल्या आणि अखिल क्रिकेटविश्वात थ्री डब्ल्यूज म्हणून विख्यात झालेल्या तिडीमधील हे एक. फ्रँक वॉरेल आणि एवर्टन विक्स हे उरलेले दोघे.
[…]

जानेवारी १६ : सीमारेषा बनली पोलिसरेषा – बॉडीलाईनचा कहर

क्रिकेटच्या जन्मभूमीच्या संघाच्या कप्तानाने परदेश दौर्‍यावर शरीरवेधी गोलंदाजीसारखे तंत्र वापरावे ही सभ्यांच्या खेळाला काळिमा फासणारी घटना होती. मुद्दामहून फलंदाजाच्या छाताडाच्या दिशेने आपटबार आदळायचे, लेगसाईड खेळण्यासाठी मुश्किल करून ठेवायची – पाच-पाच क्षेत्ररक्षक लावून – आणि फलंदाजाचा अंत पहायचा असे हे तंत्र होते. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की फलंदाजाला गंभीर इजा होण्याचा संभव अशा गोलंदाजीतून उद्भवतो.
[…]

1 4 5 6 7 8 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..