नवीन लेखन...

श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम

वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे. […]

मुक्तांगण, अलिबाग

मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.
[…]

मोहोर वृध्दाश्रम, अलिबाग

अलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात. […]

अहिल्या महिला मंडळ, पेण

आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीचा व स्त्री संघटनेचा अविष्कार दिसू लागलाय. अतिशय भावनाप्रधान मन, संवेदनशील स्वभाव, समाजातील तळागाळामधील लोकांसाठी काम करण्याची प्रखर इच्छा, समाजसेवेसाठी लागणारी तळमळ, जिद्द आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत मनात जपलेल्या नीतीमुल्यांशी तडजोड न करण्याची महत्वाकांक्षा या सर्वच गोष्टींचा अनोखा संगम स्त्री समाजामध्ये झालाय. […]

संपर्क – सामाजिक संस्था, पेझारी

बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्‍या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O. […]

छात्र प्रबोधन, अलिबाग

मुलांना विविध छंद जोपासण्याची, आपल्यामधील क्षमता पारखून घेण्याची, व स्वतःमधील शारिरीक आणि बौध्दिक शक्ती योग्य ठिकाणी वापरण्याची जर हक्काची जागा मिळाली तर त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या प्रक्रेला वेग प्राप्त होतो आणि जर समवयीन मुलामुलींमध्ये मिसळून त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करुन जर त्यांना घडवणारे छात्र-प्रबोधन सारखे व्यासपीठ मिळाले तर विचारायलाच नको. […]

बजेटची गोष्ट

अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती.
[…]

मल्हारी मार्तंड ! जय मल्हार !

उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडोबाची जेजुरी ! खंडोबा हे दैवत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही लोकप्रिय आहे. जेजुरी हे गाव पुण्यापासून अगदी जवळ आहे. या गावातल्या टेकडीवर खंडोबाची दोन ठिकाणी मंदिरं आहेत. पैकी एकाला पठार म्हणतात तर दुसर्‍याला गडकोट. कर्‍हेपठार या मंदिराच्या काहीशा वरच्या बाजुला गडकोट आहे. या मंदिराभोवती तटबंदी असल्यामुळे याला गडकोट म्हणतात. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..