नवीन लेखन...
Avatar
About अनिल गोविलकर
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

साउथ आफ्रिका – भाग १

खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून  अपेक्षित आहे. […]

विक्लांत अहिर भैरव

“मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे. […]

महंमद रफी – अष्टपैलू गायकी

रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. […]

व्रतस्थ भैरव

भैरव राग, हा भारतीय संगीतातील अति प्राचीन रागांपैकी एक राग मानला जातो. पुढे, रागांचे वर्गीकरण करताना, “भैरव” नावाचा “थाट” निर्माण केला आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात सामावून घेतले. खऱ्या अर्थाने “संपूर्ण-संपूर्ण” जातीचा राग आहे आणि यात, “निषाद”,”धैवत” हे दोन स्वर कोमल लागतात तर बाकीचे पाचही स्वर शुद्ध स्वरूपात, या रागात वावरत असतात. वादी स्वर “धैवत” तर संवादी स्वर “रिषभ” आहे. […]

नेल्सन मंडेला – जन्मशताब्दी

दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे. […]

साउथ आफ्रिका !!

मी जेंव्हा १९९४ साली या देशात प्रथम आलो, तेंव्हा डर्बन जवळील पीटरमेरीत्झबर्ग या शहरात राहत होतो. २००० सालानंतर, इथे बऱ्याच भारतीय कंपन्यांनी आपली ऑफिसेस इथे थाटली आणि बरीच मराठी माणसे इथे यायला लागली. आजमितीस, जोहानसबर्ग इथे जवळपास दोनशे तरी कुटुंबे राहत आहेत, त्याशिवाय, डर्बन, केप टाऊन, प्रिटोरिया येथील मराठी कुटुंबे वेगळी !! […]

अनिल बिस्वास – चित्रपट संगीताचे आद्यपीठ

या संगीतकाराला भारतीय संगीताची प्रचंड आवड होती आणि त्यासाठी कुठलीही लोककला आत्मसात करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे, एक फायदा झाला, त्यांच्या गाण्यात सुश्राव्यता तर आलीच पण लोकसंगीतातील “टिकाऊपणाचा” जो अंगभूत गुण असतो, त्या गुणाचा, या संगीतकाराने केलेल्या गाण्यांना फायदा आपसूकच मिळाला. […]

राग – रंग : प्रास्ताविक

भारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आजच्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे. […]

दक्षिण आफ्रिकेतले दिवस – प्रास्ताविक

….. तोपर्यंत दक्षिण आफ्रिका म्हणजे नेल्सन मंडेला ही व्यक्ती तसेच, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डर्बन आणि केप टाउन या शहरांची नावे, इतपतच माहिती होती. माझी नोकरी पिटरमेरीट्झबर्ग शहरात होती. हे शहर कुठे आहे, याबाबत संपूर्ण अनभिज्ञ होतो.  […]

गीता दत्त

आपण या गायिकेच्या आवाजाचे थोडक्यात विश्लेषण करायला घेऊ. तिच्या सुरवातीच्या गीतांत थोडा बंगाली स्पर्श जाणवतो. गीता दत्तच्या आवाजात विस्तीर्ण भावनापटांची प्रतीती येते. […]

1 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..