MENU
नवीन लेखन...
डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

ढळला रे ढळला दिन सखाया

कोन बनेगा करोडपती मध्ये प्रत्येकाला मान देणारा, न्याय देणारा, समजून घेणारा,खोटं खोटं न हसणारा, गंभीर होणारा अभिताभ. एकेक नायक एक एक पिढीवर राज्य करत असतो, अनेकांच्या मनावर राज्य करत असतो. […]

बालसाहित्यिकांच्या प्रेरणेची भरारी

लहान मुलाकडे पाहून आपल्याला प्रेरणाच मिळते म्हणून आपण म्हणतो लहान पण देगा देवा आपल्याला पुन्हा लहान मुलासारखं निरागस व्हावंसं वाटतं. प्रेरणेचे खत मिळाले की व्यक्तिमत्व बहरतंच. माणसे पोकळीत वाढत नाहीत माणसांना सहवास आवश्यक असतो तो हवाहवासा प्रेमाचा असेल तर केवळ आनंददायी नव्हे तर कर्तुत्वाकडे नेणारा तो हवाहवासा प्रवास असतो. […]

अजून त्या झुडपांच्या मागे

फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात. […]

किरणें आशेची

सुरज की किरणें रोज आती रहे, जाती रहे.साथ लायें रोज किरणोंका मेला. सुजाता मधील हे गाणं. अशी अनेक गाणी ज्यांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. जीवन भरभरून जगायला शिकवलं.
माणसे घडण्यासाठी निमित्त लागतं. […]

यशोशिखरांकडे नेणारी प्रेरणेची पायवाट

कुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी. […]

मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची

यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय,त्याचबरोबर६३तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे. […]

पाणी

लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. […]

सरसकट ची झाली कटकट..

आदर्श परिस्थितीत प्रत्येक शैक्षणिक धोरण चांगलेच असते, त्याचा निकाल लावणे हे राबविणारऱ्यांच्या हातात असते. आता सरसकट पास करण्याचे धोरण बंद होणार. केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा साठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

अपंगांच्या समस्या सुटल्या प्रेरणेतून

अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां. […]

प्रेरणा अंध नसतें

अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार. […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..