नवीन लेखन...
डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार. […]

प्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार 

प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.  […]

शिस्तीचा ढासळलेला बुरुज 

शाळा नावाचं मंदिर असो की, परमीटरुम, राजकारण्यांची शिफारस लागते, “अर्थ”  असल्याशिवाय शैक्षणिक संस्था मिळत नाहीत, विनाअनुदान, अनुदानित करण्यासाठी “अर्थ” आवश्यक आहे. विनाअनुदानाचे दुकान उघडण्याचे व त्याला अनुदान मिळवून घ्यायचे. राजकारणातल्या  अस्तित्वासाठी, तिकिट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, सहकारी संस्था, परमीटरुम, वर्तमानपत्र, खून, बलात्कार हा स्वतःच्या साम्राज्याचा भाग अनेकांना आवश्यक वाटायला लागला. […]

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे. […]

जादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें

जादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाबा अवतार घेतच आहेत.जादूटोणा विरोधी कायद्याने काही प्रमाणात नियंत्रण आले असेल, पण रोज अंधश्रध्देचे तण वाढतच आहे.प्रसारमाध्यमांची जादू ओसरली व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला तरच जादूटोणाविरोधी कायदा सक्षम होईल. […]

लक्ष्मणरेषा श्रध्दा – अंधश्रध्देची

कार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही… […]

प्रेमकथा : पूर्वीच्या आणि आजच्या 

प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. असंख्यांना भुरळ घालणार्‍या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्‍या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.   […]

शिक्षणपध्दती समान, मूल्ये असमान

एकच शिक्षणपध्दती, एकच प्रतिज्ञा पुस्तकाच्या पहिल्या पानावर भारतभर असतांना मूल्यांमध्ये जमीन आसमानचा फरक का? काश्मीरमध्ये विद्यार्थी लष्करावर दगडफेक करतात, काही ठिकाणी देशद्रोह, काही ठिकाणी देशभक्ती झिरपते. काही ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन, काही ठिकाणी अंधश्रध्दा झिरपते, असे कां? […]

गुणवत्तेपुढचे शिक्षण

आज गरज आहे ती गुणवत्तेपलीकडील शिक्षणाची म्हणजेच यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणार्याे शिक्षणाचा, प्रतिभेला न्याय व बहर आणणारं, कौशल्याचा विकास करणारं शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, आनंददायी ह्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात आणणारं शिक्षण. […]

मनोरंजनाचे जग

निसर्ग हेच पूर्वी मनोरंजनाचे साधन होतं. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, चांदण्या, सूर्य याभोवती गाण्याचं इंद्रधनुष्य गुंफलं जायचं. निसर्ग जसा जसा कमी होत चालला, प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला.निसर्गदत्त सौंदर्य नजरेआड, दुर्मिळ होऊन प्रसारमाध्यमांतून अनेक गोष्टी झिरपू लागल्या. माहिती व तंत्रज्ञान युगात मनोरंजनाच्या नावाखाली नको ते उथळ, संस्कृतीचं विपर्यास्त स्वरुप, विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारं, सासू-सुनांचे द्वेष, अंधश्रध्दा, पसरविणार्या् गोष्टी येत आहेत. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..