नवीन लेखन...
डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

संगीताचा वारसा

वारसा ही जतन करण्याचीच गोष्ट नव्हे तर संवर्धन करणंही त्यात अपेक्षित आहे. संवर्धनासाठी जतन आवश्यक. वारसा मग तो कोणताही असो सांस्कृतिक, नैसर्गिक त्याची वर्षावर्षाला घसरण होत चाललीय. शास्त्रीय संगीत नामशेष होत चाललं असून “स्त्री” या विषयाभोवती संगीत पिगा घालीत आहे. सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचे भावनिक प्रसंगाच सोनं करणारं संगीत आजही काहींच्या मनावर राज्य करुन आहे म्हणून “जतन” संवर्धनाच्या थोड्या आशा आहेत. […]

जाहिरात : अंदर की बात

जाहिरातींतून जे जे येत आहे ते समाजाचे मानस ठरत आहे. केवळ मालाचे खपच नव्हे तर राजकीय, सामाजिक आर्थिक चित्राला जाहिराती रंग देत आहेत. जाहिरातीतून नको ते बिंबवलं जातय, नको त्या वस्तूंचा संग्रह वाढीस लागत आहे. शेजार्याबकडे आहे मग आपल्याकडेही हवं ही वृत्ती वाढली. जास्त जाहिरात, मोठी जाहिरात, सातत्याने जाहिरात लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, खच्चीकरण करत आहे. […]

लोकमानस बदलणारी प्रसारमाध्यमे 

आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्यांचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा? सेलच्या जाहिराती, नियुक्तीसाठी जाहिराती, फसवणूक जोपासणार असतील तर आदर्शांचे अग्रलेख कशासाठी? दिशाभूल करणार्‍या गोष्टी भूल देवून केल्या जात आहे. एकीकडे वैधानिक इशारा द्यायचा आणि दुसरीकडे मृत्यू स्वस्त करायचा असे किती दिवस चालणार? […]

‘नॅक’चे शिवधनुष्य

जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल. […]

अंधश्रध्दा निर्मूलन : प्रश्न, आक्षेप, मर्यादा व अपेक्षा

आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको. […]

अब्राहम लिंकनचे पत्र पुन्हा वाचताना

मोठी माणसे पत्ररुपाने आपल्यात मृत्यूनंतरही असतात. अब्राहम लिकन आज असते तर आपले पत्र शैक्षणिक संस्था विसरल्या की काय? अशी शंका त्यांना आली असती. पत्राला ‘शोपीस केलेलं त्यांनाही आवडलं नसतं. काही पत्र काळाशी इमान ठेवून लिहिलेली असतात. काळ बदलतो, काळ सोकावतो, परिस्थितीचे संदर्भ बदलल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो. तेव्हा विचारांची उंचीच कामाला येते. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..