नवीन लेखन...
Avatar
About अनिल शर्मा
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

माझं नाटक !

मला नाटकात काम करायची हौस कधीच नव्हती. लहानपणी नाटकात किंवा सिनेमात सगळं खोटं असतं हे सत्य भिनलं होतं. लहान मुलांच्या विविध वेष स्पर्धेत (Fancy Dress Competition) मध्ये मला एक गुराखी बनवला होता. “अहो मी गुराखी आलो, गुरे घेऊन चाराया ” हे गाणं म्हणत स्टेजवर नाचलो. मला बक्षीस मिळालं होतं. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

“पुढे काय झालं?” सुरेशने अधीरतेने विचारलं. “हो रे, सांगते नां !” लककीने सुरुवात केली. “याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे […]

एक पाऊल ओल्या वाळूंत- भाग ३

सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग १

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले. […]

अडुसष्ट वर्षांपू्र्वी – भाग ३

याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं. […]

अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग २

मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं. […]

अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग १

मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो. […]

कठोर शिक्षा – भाग ५

“यशोदा बाई, जा आत्ता” यशवंतने सुचवलं. यशोदा बाई निघून गेली. “हं . आत्ता तुम्ही बोला, मिसेस शिर्के, तुमची इतकी मौल्यवान वस्तु मयताच्या हातांत कशी सांपडली? तुम्ही ती आपणहून नक्की दिली नसणार, तत्पूर्वी एक प्रश्न, तुम्ही ह्या इसमाला त्याच्या मरणापूर्वीपासून ओळखतां. होय नां?” यशवंतने आपली प्रश्नावली संपवतांना अनूचा चेहरा फिकट पडत असलेला पाहिला. “तुम्हांला बरं वाटत नाही […]

कठोर शिक्षा – भाग ४

“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला. सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला. “सावंत, त्या बाईना बोलवा.” यशवंतने इशारा केल्यावर एक मध्यम वयाची बाई आली. “या, यशोदा बाई.” यशवंतने सुरुवात केली. “हा हार तुमचा आहे कां?” यशवंतने तो हार यशोदाबाईला दाखवत प्रश्न केला. “माझा नाही.” यशोदाने उत्तर दिलं. “मग […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..