नवीन लेखन...

थेट ऑस्ट्रेलिया वारी

देशभर मी कार्यक्रम करत होतो. पण परदेशातील कार्यक्रमांबद्दल सिंगापूर व्यतिरिक्त फार काही घडले नव्हते. काही आयोजकांकडून ऑफर्स आल्या पण त्यांच्या कार्यक्रमांचा स्तर मला पटत नव्हता. शिवाय त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा दौरा करायचा होता. इतके दिवस म्युझिक अॅकॅडमी बंद ठेवणेही मला शक्य नव्हते. एकूण काय हवे तसे काही घडत नव्हते. पण प्रयत्न मात्र मी करतच होतो. […]

बिग-बीं सोबत

२ मे २००५ या दिवशी सकाळी अभिषेक बच्चन यांचा मला फोन आला. ऑल इंडिया अचिव्हर्स कॉन्फरन्स या दिल्ली येथील संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून ते बोलत होते. २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्कारासाठी माझी निवड झाली होती. मला अतिशय आनंद झाला. त्यांचे पुढील वाक्य होते. “हा पुरस्कार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते […]

मजल-दरमजल ६५०

सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक अशोक शेवडे यांच्या ‘सूर तेच छेडिता’ या कार्यक्रमाच्या अनेक प्रयोगात मी गायलो. माझ्याबरोबर मनोज टेंबे, मीनाक्षी गुणाजी, अलोक काटदरे, नीलाक्षी पेंढारकर, पुष्पा पागधरे असे अनेक कलाकार असायचे. निवेदनात अशोकजींच्या बरोबर प्राची देवस्थळी असायच्या. अशोकजींचे किस्से, विनोद आणि इतक्या कलाकारांच्या सहवासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच मजा यायची. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाला ७५ वर्षे […]

असाही एक शिष्य…

श्री कांतजींच्या निधनानंतर काही दिवस मी कार्यक्रम करणे थांबवले होते. आमच्या स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीत मात्र दिवसभर गाणे शिकवायचो. एक दिवस एक तरुण मुलगा गाणे शिकण्यासाठी आला. तो म्हणाला, “मला गाणे शिकायचे आहे सर, पण मला गायक बनायची इच्छा नाही.” मला नवलच वाटले. मी विचारले, “मग तुला गाणे का शिकायचे आहे?” त्यावर तो म्हणाला, “मला संगीतकार बनायचे […]

अनपेक्षित धक्का

नक्षत्रांचे देणे नंतर कार्यक्रम आयोजकांना हे एकदम पटले की फक्त हिंदी मी चांगला गाऊ शकतो. मग मराठी भावगीते, हिंदी चित्रपटगीते यांचे अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. “हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रमात तुला गाताना पाहून खूप आनंद होतो.” माझे गुरू श्रीकांत ठाकरे म्हणाले, “तू एक हजार कार्यक्रमांचे स्वप्न पहातो आहेस हे […]

नक्षत्रांचे देणे

कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळून जाते. मी असा सुखद अनुभव अनेक वेळा घेतला आहे. त्यातलाच एक अनुभव सांगतो. एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो होतो. दुपार रिकामी होती. सहजच संगीतकार आनंद मोडकांना फोन केला. त्यांच्यामुळेच ‘प्रभू-मोरे’ ही हिंदी भजनांची कॅसेट कशी बनली ते यापूर्वीच सांगितले आहे. पण त्यांच्याबरोबर मी कोणतेच […]

सोहळे

भिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते. त्यांच्यासाठी मी अनेक कार्यक्रम केले होते. एक दिवस प्रकाशमामा धामणकरांचा फोन आला. त्यांचे वडील भिवंडीचे माजी खासदार कै. भाऊसाहेब धामणकर याच्या पुतळ्याचे अनावरण करायचे होते. त्यासाठी एका समारंभाचे आयोजन ते करीत होते. माननीय नेते […]

एक रोमांचकारी अनुभव

एक अनोखा कार्यक्रम याच सुमारास माझ्या वाट्याला आला. माझे गझलचे गुरु श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मी नियमितपणे जातच होतो. एकदा त्यांच्याकडे गेलो असता श्रीकांतजींनी एका व्यक्तीची माझ्याशी ओळख करून दिली. ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ हे अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर गीत लिहिणारे हे कवी होते रमेश अणावकर. अणावकरांनी एका कार्यक्रमासाठी श्रीकांतजींबरोबर मलाही निमंत्रित केले. हा कार्यक्रम […]

६०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने

ऑल इंडिया रेडिओसाठी माझी रेकॉर्डिंग सुरू होतीच. २२ डिसेंबर २००२ रोजी रेडिओसाठी माझे २००वे गाणे रेकॉर्ड झाले. माझ्या गाण्याच्या करिअरच्या सुरवातीपासून रेडिओ माझ्या पाठिशी उभा राहिला. या २०० गाण्यांनी मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माननीय प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगन या रेडिओच्या संगीतकारांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. ठाण्याच्या सरस्वती मराठी हायस्कूलच्या सुवर्णजयंतीननिमित्त आयोजित गाण्याच्या […]

संगीत-समारोह

माझ्या वडिलांचे क्लबमधील मित्र चंद्रशेखर टिळक हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांनी ‘रसधारा’ हा गाजलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात गाण्यासाठी त्यांनी मला बोलावले. चंद्रशेखरजींशी अनेक वर्षे आमचे घरगुती संबंध होते. मी लगेचच होकार दिला. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पहिला कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आम्ही केले. अनघा पेंडसे, प्रल्हाद अडफळकर, संध्या खांबेटे आणि […]

1 2 3 4 5 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..