गॊष्ट एका राणीची.. (निवड)
अकरावी प्रवेश सुरु झाले. त्यावेळी नवीनच ओनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती म्हणून शाळेतून अर्ज भरून दिले जात होते. अर्ज भरायचा आहे, ठीक आहे पण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे काही राणीला कळत नव्हते. तिला काय बनायचं आहॆ याचा तिने कधी गहन विचार केलाच नव्हता.शाळेत जेव्हा शिक्षक विचारायचे, कोणाला पुढे जाऊन वैज्ञानिक बनायचे आहे तेव्हा राणीचा हात पहिला वर असायचा,कधी शिक्षकांनी विचारल पत्रकार बनायला कोणाला आवडेल पुढे जाऊन.. तरी पहिला हात राणीचाच वर. तात्पर्य काय तर राणीने विचार केलाच नव्हता तिला पुढे जाऊन काय करायच आहे त्याचा. […]