नवीन लेखन...
Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

घरोघरी आयुर्वेद – किती मात्रेत जेवाल?

काहीजणांचे उत्तर असेल पोट भरेपर्यंत; तर काहीजण म्हणतील मन भरेपर्यंत!! कदाचित काही स्वतंत्र बुद्धिवादींना असंही वाटेल की आता आम्ही किती खायचं हेदेखील आयुर्वेद ठरवणार का? 😉 ज्याला निरोगी राहायचं आहे अशी व्यक्ती मात्र या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करेल. आयुर्वेदाने जठराचे काल्पनिक भाग करून स्थूल-द्रव आहाराची मात्रा सांगितली आहेच. मात्र असा अंदाज घेणे हे प्रत्येकाला सर्वस्वी शक्य […]

आरोग्यवर्धक ज्वारी

आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि […]

रिफाइंड तेल कसे बनवले जाते

दिवाळीमध्ये भेसळ तेलापासून आपले व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याचे संरक्षण करा रिफाइंड तेल आरोग्यास तारक कि मारक ? तेल रिफाइंड करण्याची प्रक्रिया पाहूया : तेल रिफाइंड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे १) कच्च्या तेलामध्ये प्रथम गॅसोलीन मिसळून तेलाला पातळ करतात. “गॅसोलीन” हे “रॉकेलसारखे” एक रसायन आहे. २) त्यानंतर त्यात हॅग्झेन नावाचे रसायन घालून पुष्कळ ढवळले जाते. यामुळे तेलातील […]

तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर

गरीबाचा / मुंबईकरांचा चा नाश्ता म्हणजे वडापाव . पण गरमागरम वडा,भजी बाधून दिला जातो वर्तमान पत्राच्या कागदात. किवा वडे,भजी तळणारा कामगार ते तळून अतिरिक्त तेल शोषण साठी त्याच्या भांड्यात वर्तमान पत्रच ठेवलेले असते. एव्हडेच कशाला आपल्या घरात सुद्धा तळण करताना सुद्धा आपणसुद्धा वर्तमान पत्रच वापरतो. दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, […]

सुक्या मेव्याचा राजा – बदाम

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मामुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो. औषधी गुणधर्म शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक […]

आयुर्वेदातील विविध संज्ञा

आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन- अग्निदीपक – भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध. अपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक अवलेह – साखरेचा गुळाचा पातळ पाक. कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध. काढा – काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे. कुपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक केश्य – केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध. […]

अभ्यंग स्नान.. आरोग्याला वरदान

दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान. खरे तर प्रत्येकाने स्वास्थ […]

को जागरति?

को जागरति?—- a scientific approach about कोजागिरी पौर्णिमा आपल्याकडे साजरा होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वास्थ्याशी निगडीत असतात. गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाणे असो किंवा दिवाळीचे अभ्यंग स्नान असो,प्रत्येकात स्वास्थ्य जपणे उद्देश सापडतोच! शरद ऋतूत येणारी “शारदीय पौर्णिमा” अथवा “कोजागिरी पौर्णिमा” साजरा करण्यामागे देखील स्वास्थ्याशी निगडीत हेतू सापडतो. कोजागिरी म्हंटले कि डोळ्यसमोर येते ते “मसाला दुध”! चंद्राच्या चांदण्यात […]

1 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..