नवीन लेखन...
Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

कोरडा खोकला

कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला. कारणे श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे  कोरडा खोकला येतो. लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो. कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा […]

आयुर्वेद – मुलभूत माहिती

आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक  प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत आणि त्यामुळे आयुर्वेद हा वेदाचा एक […]

तुम्ही जास्त व्यायाम करताय का ? मग सावधान !

मॅरथॉनसाठी सराव करणाऱ्या डॉ. राकेश सिन्हा या विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वांनीच वाचले असेल. डॉ. सिन्हा अतिशय फिट होते. रोजच्या रोज सराव सुरू होता. लवकरच वयाची ६० वर्ष पूर्ण करणार होते. आजवर चार फुल मॅरेथॉनचा अनुभव गाठीशी असलेल्या, तसेच पुढील मॅरेथॉनसाठी नियमित सराव करणाऱ्या आणि अलीकडेच सर्व वैद्यकीय चाचण्यांतून त्यांचे निकाल […]

पेरू एक वरदान

आरोग्य किंवा आधुनिक युवा पिढीच्या भाषेत म्हणायचे तर हेल्थ किंवा फिटनेस कसा राखावा याचे शेकडो मार्ग वेळोवेळी सांगितले जात असतात. व्यायाम आणि आहार याचे त्यात अन्यन्यसाधारण महत्त्व असते. आहारात काय खावे, किती, कसे, कधी खावे याचीही माहिती सतत दिली जात असते. फळांचे आहारातील महत्त्व आपण सर्वजण जाणत असतोच. मात्र आजकाल फळांच्या किमती सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. […]

सुटलेले पोट

या छोट्या-छोट्या उपायांमुळे आपले आरोग्य संतुलित राखण्यास मदत होईल, तसेच वजनही आटोक्यात राखता येईल. […]

अन्नप्रतिष्ठा

जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोजच्या जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हाच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यासह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न किंवा इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, […]

साडेतीन मिनिटे

डॉक्टरांनी सांगितलेले – ज्यांना अगदी सकाळी अथवा रात्री झोपेत असताना लघवीला जावे लागते अशांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना – प्रत्येकाने अशावेळी साडेतीन मिनिटे जपायला हवे. हे इतके महत्वाचे का आहे ? ही साडेतीन मिनिटे अकस्मात मृत्यूची संख्या कमी करु शकतात. ज्या ज्या वेळी असे जेव्हा घडले त्या त्या वेळी शारीरीक दृष्टीने तंदुरुस्त असलेल्या व्यक्ती रात्रीच मृत्यू पावल्या. […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..