गोमु पैज घेतो (गोमुच्या गोष्टी – भाग ११)
विजापूरच्या बादशहाने शिवाजी राजांना धरण्याचा/मारण्याचा पैजेचा विडा दरबारांत ठेवला होता. तो अफजलखानाने उचलला. त्याचे पुढे काय झाले ते आपल्याला माहित आहेच. तेव्हां कुठलीही पैज घेणं ही गोष्ट सोपी नाही. मला वाटते पैज घेणे किंवा कठीण गोष्ट करायचे आव्हान देणे हे पुराणकालापासून चालत आलेलं असावं. महाभारतात असे बरेच प्रसंग आहेत. प्रतिज्ञा आणि पैज यांत अर्थातच फरक आहे. प्रतिज्ञा करणाऱ्याला कुणी आव्हानही देत नसत आणि नंतर बक्षिसही देत नाही. पैज घेतांना एक आव्हान देणारा असतो आणि दुसरा ते स्वीकारणारा असतो. पैज जिंकला तर जिंकणाराला काय मिळणार आणि तो हरला तर काय द्यावं लागणारं हे पैज घेतानाच ठरतं. त्यादृष्टीने महाभारतांतला द्यूत खेळण्याचा प्रसंग पैज ह्या सदरांत मोडतो. […]