नवीन लेखन...

महाराज

महाराज म्हटल्यानंतर मराठी माणसाच्या मनांत आठवतात, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल लिहायला सुध्दा पात्रता लागते, ती मी मिळवलेली नाही. पण महाराज हे विशेषण इतरही कांही जणांसाठी वापरलं जात. विशिष्ट प्रकारचा मसाल्याचा चहा आणि बरोबर फाफडा बनवून विकणा-यांनाही महाराज म्हणतात. गुजरात मारवाडमधे स्वयंपाक्यांनाही महाराज म्हणतात. […]

सैनिकाच्या मुलाची दिवाळी

१. दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी […]

एका वृध्दाची आत्महत्त्या

यशवंत आणि चंदू ह्यांच्यासमोर एक चाळीशीचा तरूण बसला होता. कपड्यांवरून तो परदेशांतून आला असावा, असे वाटत होते. यशवंतांची त्याने रितसर फोनवर वेळ घेतली होती आणि तो आला होता. एवढ्या उमद्या सुस्थितींतील तरूणाची समस्या काय असावी, ह्याचा यशवंत अंदाज घेत होते. अशोक मनोहर हें नांव त्यांनी अलिकडेच पेपरमध्ये वाचलं होतं. तो म्हणाला, “मी आपल्याला माझे नांव फोनवर […]

पेट्रोल-चोर

दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं. […]

शास्त्रीबुवा

झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत. त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव […]

हॅास्पिटलमधून बाळ गायब

गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता. […]

माझा वाढदिवस

आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच. […]

निस्सीम प्रेम

नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या […]

राणीसाहेंबाचे गुपित

यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली. […]

स्वामी विवेकानंद- भाग ३

स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं. […]

1 2 3 4 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..