मुखवटा नाटीका क्रमांक २ (आठवणींची मिसळ २२)
नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल. समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे. नायक-नायिका रंगात आली आहेत. प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय. ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !” त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो. […]