स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती (आठवणींची मिसळ १२)
“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. […]