बाबल्याची गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २)
एव्हाना मी कथा लिहायला लागलो होतो.अनेकांनी मला बाबल्यावर कथा लिही म्हणून सांगितलं.मीही त्या घटनांचा अनेक अंगानी विचार केला.पण वरील दोन प्रश्न समाधानकारक रित्या सुटल्याशिवाय बाबल्याची गोष्ट पुरी होऊ शकत नाही हे माझ्या लक्षांत आलं.मी लहानपणी ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचे दुवे वेगवेगळ्या प्रकारे जुळवून पाहिले.बाबल्या आणि त्याच्या वयाच्या, म्हणजे पंधरा ते सतराच्या, मुलांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं.पौगंडावस्थेतील मुलांची लैंगिक सुखासाठी चाललेली धडपड (विकृत, कुणास ठाऊक ?) माझ्या दोन तीनदा दृष्टीस पडली होती.मी तेव्हां लहान होतो.पण त्याचा अर्थ नंतर चांगला कळून आला होता.मग बाबल्याच्या आईच्या जीव देण्याचा संबंध त्या मानसिकतेशी होता काय ?बाबल्या आणि त्याची आई यांच्या संबंधात बाबल्याच्या हातून अशी कांही लाजीरवाणी गोष्ट घडली होती काय ?थोड्या रासवट, थोराड, भोळसर बाबल्याने अनावर लैंगिक वासनेपायी एकाच खोलीत झोपणाऱ्या आईला लाजीरवाणं वाटाव असा अतिप्रसंग तर केला नसेल ना ? […]