नवीन लेखन...

सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच ! […]

पुनर्जन्म (लघुकथा)

आर्थिक अडचणी वाढू लागल्या की नातेसंबंध बिघडू लागतात, ते सावरायचे कसे याचा विचार करताना स्वतःची प्रकृती ढासळू लागते.संकट येऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूनी येतात आणि अनेकांचे सल्ले मानून मी मारुतीला दर मंगळवारी लवंगांचा हार आणि शनिवारी शनिमंदिरात बाटलीभर तेल घालू लागतो. […]

भावना

एका बेसावध वळणावर तू मला भेटलीस …… मला तुझ्यात गुंतवून, तू माझ्यात विरघळलीस ….! माझ्या सोनेरी क्षणांची महिरप तू झालीस…. गुलाब,चाफा,अन् केशर कस्तुरी सुगंधाची बरसात तू केलीस …! चार फुलांची आस माझी तृप्त तू अशी केलीस… चांदण भरली तुझी मुठ माझ्या ओंजळीत रिती केलीस ! तप्त ग्रीष्मात सावली झालीस शीतल संध्येला सखी, चाहूल लागता मज संकटाची […]

निशिगंधा

तिने कधीतरी विचारलंस, अरे तुला कुठलं फुल आवडते ? तेंव्हा मी क्षणात उत्तरलो.. मनात जपायला चाफा आवडेल आणि ओंजळीत धरायला मोगरा… वहीत ठेवायला बकुळ आवडेल आणि धुंद व्हायला केवडा… बोलायला अबोली आवडेल आणि फुलवायला सदाफुली… पण, प्राजक्त मात्र आवडेल तो, हृदयाशि धरायला..आधारासाठी… यावर ती थोडीशी नाराज झाली, मी ते ओळखलं… पुढे झालो आणि हलकेच हसत म्हणालो, […]

योद्धा (कथा)

अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त  घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा. […]

चिता

जिथे वेचला प्राजक्त तिथे गोवऱ्या नशिबी आल्या कोमल निशिगंधाच्या पाकळया नजरेसमोर चोरीला गेल्या कुठे मागावी दाद फिर्याद सुगंधच फितूर झाला बघता बघता चोराच्या श्वासात तो सामावला शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी स्वतः ला हरवून बसलो स्वतः च पेटवलेल्या चितेत धुमसत जळु लागलो © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८०

नातं

नातं जिवा-भावाचं सढळ…..अढळ ! नातं प्रिती-प्रेमाचं रसाळ …..मधाळ ! नातं राग-लोभाचं खट्याळ…..स्नेहाळ ! नातं दुःख – हर्षाचं उदास …..उधाण ! नातं विरहात एकटे व्याकुळ ! नातं मनांत सूर गात्रात ! नात्याची गुंफण रेशमी….रेशमी ! बंध रेशमाचे अखंड….अतूट ! कस नात्याचा झळाळे सुवर्ण ! पाईक नात्याचा पवित्र ….पावन ! बाज नात्याचा मस्त उनाड ! साज नात्याचा प्रेम […]

करोना (कथा)

उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार. […]

प्रेम

प्रथम तिज पहाता अग्नी मनी चेतला , झालो बेधुंद मी अंतरी वणवा पेटला ! आर्त नजर तिची मन घायाळ करून गेली एकमेकात गुंतलो आम्ही …. मनोदेवता सांगून गेली ! खट्याळ चमक तिच्या नेत्री स्वर्ग सुख पाझरले गात्री त्या क्षणी गेलो हरवून ती माझी,मी तिचा बनून ! होऊनी एकाकी जेंव्हा .. मोजतो अंधारी तारे , अलगद चाहुलीने तिच्या फुटती नवे धुमारे ! जेंव्हा दुखी बुडे आकंठ उरे जीवनी नुसती खंत पुरे  तिची चाहूल आगळी जीवनी येई नवी झळाळी ! क्षणो क्षणी वाटत राही तिच्यात मी सहचरी पाही झाले  दूर सगळे अज्ञान जुळता, तिचे मन माझे मन ! © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८० आपल्या अभिप्रायाचे स्वागत. आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

वेदना

भेट तिची माझी थेट नभ-धराची सुख क्षण भराचे आस जीवनाची भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी आठवांचा ताटवा,असे सदा सोबती सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना कोण घेईल समजून,माझ्या यातना माणसाचे जग की,दुनिया पत्थराची जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची भावना अनावर होती,सांज सकाळी बावऱ्या मनाला, नच सुचे काही जीवघेणी […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..