नवीन लेखन...

भूमिका (कथा)

आपण खूप मोठी शाब्दिक कोटी केल्याचा आनंद सिंगच्या डोळ्यातून वहात होता. अंजुला सगळं सगळं आठवलं. घर सोडल्यापासून इथं पर्यंत केलेला प्रवास, त्यात ते रुतलेले काटे, त्या वेदना, त्या खोट्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग. एकावर एक पचवलेले दुःखाचे कढ…… आणि या सर्वात निस्सीम प्रेम करणारा संजू! […]

कविता

मी कविता का लिहितो हे मला खरंच कळत नाही.. मीच, मला घातलेलं कोडं कांही केल्या सुटत नाही ! कारण जिच्यासाठी मी रात्रीचा दिवस करतो, आणि लिहितो, तिच्या पर्यंत त्या कधीच पोहोचत नाहीत.. आणि माझ्या व्याकुळ मनाची परत घालमेल नको, खपली निघायला नको म्हणून, मी ही त्या परत वाचत नाही.. तरी हि मी लिहितो….. का लिहितो कळत […]

मंदीतील सुवर्णसंधी

सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता. […]

अन्नपूर्णा

जेंव्हा जेंव्हा  प्रवासाने आम्ही दोघे दमलेलो असतो …….. थकून, कंटाळून घरी येतो, झोमॅटो तिला नको असतं, म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते ! माझी आवड सांभाळून ती सांडगे पापड़ हि तळते ….. त्यासोबत  न विसरता लोणच्याची फोड वाढते कारण आम्ही दोघे दमलेले असतो तेंव्हा खरंच पिठलं भात असा साधाच बेत असतो ! कैरी लिम्बाचे लोणचे …. […]

आम्र यज्ञ

गुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे सण घराघरात हा साजरे करतो, ज्यांना देवगड चा रुबाब परवडत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी हापूस असतो. तो हि खिशाला जड वाटला तर कर्नाटकी, पायरी इत्यादी चुलत-मावस भावंडे तृप्तीचा ढेकर सोबत घेऊन येतातच. जसे गणरायाचे दर्शन वेगवेगळ्या रुपात, भावमुद्रात होते तसेच हा कोकणचा राजा रोज वेगवेगळ्या रंग रुपात आम्हाला भेटत रहातो….. […]

पांढरपेशी

एक पांढरी पाल वर वर चढायची ….. मनात माझ्या खोल … खोल जखम करायची जखम रक्ताळलेली चिघळत रहायची … पालीच्या चुक्चुकण्याने खपलीहि निघायची त्या पालीचे सगे सोयरे करीत मौज जमायचे स्वार्थाच्या तलवारीने पंख माझे छाटायचे ….. अपंग मी, गलितगात्र, वेदनेने विव्हळायचो पालीच्या छद्मीहास्याने गुदमरून मरायचो, आता…….. हुंकार मी भरला आहे नागफणी   बनणार   आहे न्याय हक्क मिळवून […]

मी व माझा मामा (कथा)

आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती. […]

मैत्र

मैत्र बनून आलीस जीवनी न्हवते कधी ध्यानी-मनी गुंफून स्नेहाचे धागे रेशमी व्यापलीस तू , माझी अवनी ! कधी राग, कधी लोभ कधी चिडू, कधी गोडू कैरीची लज्जत, हापुसी गोडवा दिलास मैत्रीला,आयाम नवा ! शांत सुखी जीवन सागरी आली कैक तुफानी वादळे भिरभिरती नौका सांभाळत उभी तू, जणू दैवी सुकाणू ! नाही कसला गर्व, तुला निरागस स्नेहाचा, […]

विस्मय (अलक)

दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. […]

जीवनरेखा (कथा)

बाळाप्पा खोत बऱ्यापैकी श्रीमंत. दहा एकराचा काळ्याभोर मातीचा मळा, त्यात असणाऱ्या दोन तुडुंब भरलेल्या विहिरी. एक विहिरीला पंप तर दुसरीला मोट, शेताला पाणी पाजवून हिरवं गार करायची आणि बाळाप्पाचा खिसा नोटांनी भरत ठेवायची. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..