भय (अलक)
पहाटे आई देवा घरी गेली. वैकुंठात सोपस्कार आवरून घरी परतलो. दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती. — © अरविंद टोळ्ये
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions