नवीन लेखन...
Avatar
About श्रीकांत पेटकर
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने

का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने का निवडावे माझे लिहण्याचे तुमच्या म्हणण्याने॥ स्वतंत्र अाहे कधीही काही मनात तेच घोळत राही शब्दांस निवडून उतरत जाई तन मन त्यात रमे ठायी ठायी का ठरवावे माझे बोलण्याचे तुमच्या अादेशाने॥ का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने ॥ माणूस,प्राणी,वृक्षझाडीवेली कितीक अाणिक असे भवताली अाकाश,डोंगर मज साद घाली या सगळ्यांचा असे कोण […]

कबूल

कबूल, आम्हीच त्यांना निवडून दिलेले! कबूल, आम्हीच त्याबद्दलच भोगलेले! — श्रीकांत पेटकर  कौशल

झाड… आणि तुम्ही

एकेकटे पाहून झाडं तोडता तुम्ही दाटी असता वृक्षाची …… अटकता ,लटकता , भटकता तुम्ही ….! — श्रीकांत पेटकर. कौशल

तू नसता

तू नसता मी सैरभैर तू असता स्थिर होतो ! — श्रीकांत पेटकर  कौशल.

नजरेचा बलात्कार

कुठुन कुठुन नजरा जातात शिरत राहतात अंग बघायला बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात पाठीवर हातावर कधी छातीवरही काही झरोके ब्लाॅउज अन साडीच्या मधला भागही शोधत राहते अन मोठाच बलात्कार करत असते नजर एकही अंग उघडं नसलेल्या अंगभर कपडे घातलेल्या बाईवर ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा  काठ ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन…. तेव्हा ! — श्रीकांत पेटकर 

हायकु

एक.. वाळली  पाते वावटळीशी नाते बोडके  झाड…. दोन लाट येणार नक्की  विचारणार घर  कोणाचे ? तिन उदास पाने भरकटत  वारा आनन्दी  गाणे….. — श्रीकांत पेटकर

मी महिलादिन साजरा केला

सकाळी रोजच्या प्रमाणे अाँफीसची तयारी केली पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे मी  ओफिसला ती घरी मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे मी घरी आलो तिने पाणी दिलं चहा केला रोजप्रमाणे महिलादिनानिमीत्त सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं ……….नंतरच ती गेली कार्यक्रमाला मी तिला शुभेच्छा दिल्या रोजसारखीच आजही […]

पुन्हा नव्याने 

सगळंच विसरुन मागचं जगेन  म्हणतो नव्याने मलाच मी ओळखेन पुन्हा मी नव्याने — श्रीकांत पेटकर कौशल 

पायांचे बिल

मी  थोडा  चाललो तर  पायानी  बिल  दिले  लगेच फुटाप्रमाणे  दर  लावून आता मी  हाताला आधीच  विचारतो कविता  लिहु  का  म्हणून ? — श्रीकांत पेटकर कौशल 

मुलीच्या कविता

बालपणात एकत्र खेळतात सगळे मुलंमुली वय वाढत जाते भवतालचं मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते . ‘आता तू मोठी झालीस ‘ ऐकू येते वेळीच एकत्र खेळणं थांबवावं …….असं वाटणं अनुभवाचं . कसं सांगावं वेगळे असतात आतून सगळे वेगळे असतात स्पर्श वेगळे असतात खेळ वेगळ्या असतात नजरा आणि मुलात माणूस अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..