धोकादायक
महानगरपालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाश्याना इतरत्र हलविले आणि काही पाखरांनी तेथेच संसार मांडले — श्रीकांत पेटकर
महानगरपालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाश्याना इतरत्र हलविले आणि काही पाखरांनी तेथेच संसार मांडले — श्रीकांत पेटकर
नाव आहे गाव आहे ….आणखी का जोडणे रे ? साम आहे दाम आहे…..आणखी का ओढणे रे ? माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि जात आहे , पात आहे…..आणखी का तोडणे रे ? राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर दोन आहे,चार पाहे……आणखी का लोढणे रे ? केवढ्या चालीरिती ….चाली दलालांच्या असे या शाप आहे ,पाप आहे…..आणखी का खोडणे रे […]
मुळ गझल “मोहसीन नक्वी” यांची आणि “गुलाम अली” यांनी गायलेली सुंदर रचना . मी मराठीत सरळ सरळ रूपांतर केले . बघा आवडते का ? इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो ( किती दिवसानंतर भेटते तू गं कोणत्या विचारात डुबते तू गं) तेज़ हवा ने मुझसे पूछा, रेत पे क्या लिखते […]
बालपणातल्या गमती जमती […]
फेब्रुवारीला एवढी का बरं घाई दोन दिवस आधीच गुंडाळल्या जाई ! ****** आली का सुचना,आदेश कुठून आताशा फेब्रुवारी आटोपतं घेवून गुंडाळतो गाशा ! — श्रीकांत पेटकर
एका दिवसाने , एका पावसाने , एका प्रवासाने किती किती शिकवलं ना मला . ही कथा माझी असेल ..तुमचीही असू शकते ना ? […]
इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना गरीबांच्या घरीच तेवढं छपरातून का डोकावून पाहावं आकाशानं ? — श्रीकांत पेटकर
थोडा रिकामा दिसलो रे दिसलो की एखादा शब्द येतो कुठूनतरी त्याला थोडं गुणगुणलं कि अजून दुसरा मग तिसरा असे येत राहतात फेर धरतात मी सुद्धा जास्त विचार करत नाही शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो मला बरं वाटते …छान वाटते ते काही म्हणत नाही अन मीही काही म्हणत नाही हे सारं कविता आहे की अजून दुसरं […]
असे कसे प्रकट होतात काही संतजन ज्यांना नसतात मायबाप नसते जन्मतारीखही प्रकटू देत त्यांचे त्यांना भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी मला काय त्याचे…. पण म्हणतो देशासाठी देशाच्या सिमेवरही प्रकट व्हा हो संतानो असेच युध्दाचे वेळी हजारो संख्येनी !
घर -दार ऑफिस- बिफीस पोरं-सोरं लोकल -बिकल रीक्षा -बिक्षा रोज दिवसभर जा- ये पुन्हा तसंच ये -जा लोकल- बिकल परत -फिरत घर -बार जेवण- खावण जीवन -बिवन चालत राहतं वेळ कुठे कविते-बिवितेसाठी? ती तर सतत–सोबत पाठी- पाठी मुखी -ओठी/// # कौशल श्रीकांत पेटकर ९७६९२१३९१३
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions