नवीन लेखन...
Avatar
About श्रीकांत पेटकर
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

आ ई

सायंकाळची वेळ होती . आई रोजच्यासारखी घरातील कामं करीत होती . रविवार असल्यानं बाबा बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते . दिवसभर निवांतपणे ती तिची कामे करत होती . मुलांना आज खेळायला मुभा होती .पण झोपण्यापूर्वी दोन तास तरी अभ्यास करून घ्यावा असा आईचा नेहमीची शिस्त होती . परीक्षाही जवळ आlल्या होत्या . तिने मुलांना हाक मारली […]

चांगुलपणाचा अनुभव

जगात चांगुलपणा ही आहे . हे कळले.. पोलीस तसेच तो टँक्सीवाला यांच्यामुळे.. नेहमी लक्षात राहील असा होता हा अनुभव. […]

एक झाड

एक झाड सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं अक्षरांनी लगडलेलं मी वेचतो,मी तोडतो मी जमवतो खुप अक्षरे आणि बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून माळेसारखी ओवून वाचकासाठी ठेवतो काही माझ्यासाठीही….. कुणी म्हणतात याला कविता कुणी गझल आणि कुणी काहीही! — श्रीकांत पेटकर

चालणे सुरु तर कर

चालणे सुरु तर कर ….पोहोचणार नाही कशावरुन ? बोलणे सुरु तर कर …टाळ्या पडणार नाही कशावरुन ? टिम्ब काढ रेषा होतील…रेषारेषांचे चित्र जाईलच बनून आवड तयार होईल …कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ? लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून जमणार नक्की …लाईक मिळणार नाही कशावरुन ? हे जमत नाही ते जमत नाही…सोड सांगणं( गाऱ्हाणं) […]

ठेवावं  लांब लोका

ठेवावं  लांब लोका , भविष्य  सांगणाऱ्या बाळास माहिती द्या , आताच रांगणाऱ्या /   गलका कसा बरे  हा ? भवताल भाटगाने हलकेच नजर ठेवा ,लोकांस पांगणाऱ्या /   आणील  आसमंता ,ठेवील या कराशी तोडाच त्या कराला ,भिकेस मागणाऱ्या /   सारेच आनंदी  वातावरण भोवताली शोधाच कोण आहे , बाम्बस टांगणाऱ्या /   गझलेत ‘कौशला ‘ म्हणे हा मक्ताच झाला नाहीच आवडली ,डांबास डागणाऱ्या — श्रीकांत पेटकर

केवढ्या चालल्या हालचाली

केवढ्या चालल्या हालचाली तुझ्या सांगते खुणवते देहबोली तुझ्या // मोहवीते तुझे हसणे लाघवी ओळखीच्या मला घालमेली तुझ्या // वाट पाहत उगा भटकलो त्या स्थळी भेटलो आज त्या पानवेलीं तुझ्या // मागुनी येऊनी हात नयनापुढे आठवे मागच्या बोलचाली तुझ्या// दिसते सारखी ‘कौशला ‘ का बरे ? स्फुरते काव्य……. ना काळवेळा तुझ्या//

गोड चोरी

रविवारला विदर्भ एक्सप्रेसने नागपुरवरुन कल्याणसाठी यायला निघालो. नेहमीच खिडकीतुन कितीदा बाहेर बघत राहायचं. तसा पाउसही नव्हता.. बाहेरचं दृश्य बघण्यासाठी….! […]

बघते नुसती हसते नुसती

बघते नुसती हसते नुसती फसवत फसवत फसते नुसती ! लाडिक चालणं लाडिक बोलणं खुळ ही लावत असते नुसती ! बंदच डोळे उघडे डोळे डोळ्यापूढे दिसते नुसती ! सुचवत काही सांगत काही काव्यातहि असते नुसती ! असते छानच नसतानाही विचारातच असते नुसती ! — श्रीकांत पेटकर

अखेरचे येवून जा एकदा

निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा / तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा ! कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा ! अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा! झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा ! शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा! जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा! — श्रीकांत पेटकर 

लढाईस लागा

जवळ वेळ आली ……तयारीस लागा जवळ वेळ आली ……विलासास त्यागा/ फितूर दिसती येथले लोक छूपे जवळ वेळ आली…… लढाईस जागा / कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला जवळ वेळ आली…… शहाणेच वागा / बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले जवळ वेळ  आली….. तपासाच धागा / निर्णयात क्षण दवळावा कशाला जवळ वेळ आली…. कशालाच त्रागा / @कौशल(श्रीकांत पेटकर ) २२/ […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..